स्नेह आशा फाउंडेशनच्या डिजिटल प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांची कल्पकता लक्षवेधी; अवघ्या महिनाभरात विकसित केलेल्या ॲपचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक When Compassion Meets Action. Reliance Foundation Hospital — where hope meets healing. Iqbal's new journey begins. वयाच्या ६५व्या वर्षीही चवीसोबत देत आहेत महिलांना रोजगाराची गोडी; अन्नपूर्णा परशुराम चव्हाण यांची प्रेरणादायी वाटचाल कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; ईईए २०२६ भारतातील प्रदर्शन आणि MICE उद्योगातील सर्वात मोठा मेळावा ठरणार ॥॥ डाॅ. गुंथेर सोन्थायमर : महाराष्ट्राची लोकसंस्कृती लोकदैवते आणि ग्रामीण परंपरा अभ्यासक ॥॥ पंजाब मेलने आपल्या सेवेच्या गौरवशाली ११५व्या वर्षात पदार्पण केले हे जीवन सुंदर आहे… थोडंसं मनासारखं जगून तर पहा म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी केली वांद्रे पूर्व परिसरातील पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी ‘पनवेल महानगरपालिकेकडून ‘अग्निशमन सेवा सप्ताह २०२६’ निमित्त व्यापक जनजागृती उपक्रम’ उष्णतेचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य सांभाळण्याचे महापालिकेचे आवाहन तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी : आयुक्त श्री.मंगेश चितळे Rail history gets a reset: Minister shares authentic image of Thane’s first train bridge पनवेल महानगरपालिकेचे आवाहन : पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सोयीस्कर इंधनाचा वापर करा – PNG गॅस पाईपलाईन कनेक्शन घ्या! Thai Curry with Quinoa कोकण आता मागे राहणार नाही ! रत्नागिरी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकणाच्या विकासाचा मंत्र पश्चिम रेलवे का 70वाँ रेल सप्ताह समारोह. *एनएमएमटी बससेवेबाबत जाहीर आवाहन* महाराष्ट्र खो-खो असोसिएशन ४४ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा. नववर्षाची पहिली पहाट बाप्पाच्या चरणी: सिद्धिविनायकात ४ लाख भाविकांची महागर्दी इटलीतून हाकललेली कंपनी कोकणात; कोकणवासींमध् संताप ये विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत..... साखर (Diabetes) म्हणजे काय? आजकाल BP वाढण्याचे प्रमाण का वाढले? कारणे, लक्षणे, धोके आणि नियंत्रणाचे घरगुती उपाय हृदयविकाराचा वाढता धोका – आणि स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे थॅलेसेमिया म्हणजे काय? संपूर्ण माहिती – कारण, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध

पनवेलमध्ये 'गुरु-शिष्य स्नेहबंधा'चा भावनिक सोहळा; जुन्या आठवणींच्या कल्लोळात हरवले आजी-माजी विद्यार्थी १९८५ ते २००५ च्या बॅचचा स्नेहमेळावा

  • by
  • Nov 25, 2026

पनवेलमध्ये 'गुरु-शिष्य स्नेहबंधा'चा भावनिक सोहळा; जुन्या आठवणींच्या कल्लोळात हरवले आजी-माजी विद्यार्थी
१९८५ ते २००५ च्या बॅचचा स्नेहमेळावा

पनवेल (प्रतिनिधी) 'ज्यांच्या संस्कारांनी आयुष्याला आकार दिला, त्या गुरुजनांशी पुन्हा एकदा स्नेहाचे धागे विणण्याचा सोहळा...' अशाच काहीशा भावुक आणि चैतन्यमयी वातावरणात नुकताच पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 'गुरु-शिष्य स्नेहबंध' हा अभूतपूर्व कार्यक्रम शालेय शिक्षिका श्रीमती वसुधा दळवी पितळे, श्रीमती सुलभा जोशी आणि श्रीमती स्मिता हर्डीकर यांच्या अथक परिश्रमा मुळे मोठ्या उत्साहात  पार पडला. गुरुजनांप्रती असलेला आदर आणि विद्यार्थ्यांवरील निखळ प्रेम यांचा सुंदर संगम यावेळी पाहायला मिळाला.
दळवी मॅडम आणि इतर शिक्षकवृंदांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्यासाठी १९८५ ते २००५ या दोन दशकांतील माजी विद्यार्थ्यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. ज्या शिक्षकांच्या मुशीतून हे विद्यार्थी घडले, त्यातील अनेकजण आज समाजजीवनात सर्वोच्च पदांवर विराजमान आहेत. यामध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यासोबतच डॉक्टर, अभियंते, वकील आणि यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावलेले अनेक माजी विद्यार्थी या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा 'विद्यार्थी' बनून एकत्र आले होते.
कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, आयुक्त मंगेश चितळे, नगरसेवक परेश ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर वृषाली पाटकर यांनी सादर केलेल्या अनोख्या प्रार्थना नृत्याने उपस्थितांची मने जिंकली व सभागृहात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली. ज्येष्ठ पत्रकार प्रशांत शेडगे यांनी आपल्या ओघवत्या आणि खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत सोहळ्यात रंगत आणली.

चौकट
आठवणींच्या हिंदोळ्यावर रमले माजी विद्यार्थी

या कार्यक्रमाचा सर्वात भावनिक आणि अविस्मरणीय क्षण म्हणजे दळवी मॅडम यांनी केलेला एक आगळावेगळा प्रयोग. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना काही क्षण डोळे मिटण्यास सांगितले आणि आपल्या मधुर शब्दांतून शाळेच्या सुवर्णकाळातील आठवणींना उजाळा दिला. त्या काही क्षणांतच सर्वजण आपला आजचा मोठेपणा, पदाचा भार आणि दैनंदिन ताणतणाव विसरून अक्षरशः शालेय जीवनाच्या त्या निरागस जगात हरवून गेले. अनेकांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले होते.

चौकट
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञतेचे ऋण व्यक्त केले. 'आज आम्ही ज्या काही उच्च पदांवर आणि यशाच्या शिखरावर आहोत, त्याचे संपूर्ण श्रेय केवळ या शाळेने लावलेली शिस्त आणि गुरुजनांनी दिलेले दर्जेदार शिक्षण व संस्कार यांनाच जाते,' अशी भावना विद्यार्थ्यांनी दाटून आलेल्या कंठाने व्यक्त केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला हा सोहळा केवळ एक स्नेहमेळावा न राहता, गुरु-शिष्य परंपरेचा एक सुवर्णअध्याय ठरला.

रिपोर्टर

  • The Global Times
    The Global Times (Admin)

    Our news reporter is a dedicated professional with a sharp eye for detail and accuracy. Specializing in breaking news and local affairs, they bring trusted updates daily with clarity and speed. With years of experience on the field, their reporting is both insightful and reliable. Known for ethical journalism, they ensure every story is verified before it reaches you.

    The Global Times

संबंधित पोस्ट